थोडेसे आमच्याबद्दल
आमच्याबद्द्ललिहायचे म्हणजे, तसा विचार करावा लागतोय, कारण स्वतःबद्दललिहिण्याची अजून
तरी गरज भासली नव्ह्ती. पण प्रयत्न करुया..
तर मायईमॅगझिन्स डाट कॉम ही संकल्प्ना कशी जन्मालाआली.भारताबाहेर असल्यावर प्रत्येकाला
आपल्या भारताबद्दल एक नितांत आदर आणि ओढ असते(जशी आम्हाला आहे).आणि भारताबद्दल जेवढे
पहायला, वाचायला मिळेल त्याची संधी तो कधीचगमावत नसतो. मराठी माणूस पण यालाअपवाद कसा
असेल. तर यातीलच एक ओढ म्हणजे साहित्य वाचनाची.मराठीमाणूस वाचनवेडा, उत्कृष्ट साहित्य
आपल्या वाचनांत असावे असे त्याला वाटते, पण भारताबाहेरअसल्यावर वाचनाची आबाळच जास्त,
आणि त्यातचांगले साहित्य आपल्या हाती येईल याची शाश्वतीअजिबात नाही.
ताज्या घडामोडींवरील भाष्य असणारी मासिकेही बऱ्याचदा वेळेनंतरहाती येतात आणि वाचनाचा
उत्साहच निघून जातो,आणि सर्वच मासिकांचे आपण वर्गणीदार होऊ शकत नसल्यामुळेबऱ्याच अंशी
आपण चांगल्या साहित्याला मुकतो. या बाबी आम्ही विचारात घेतल्या आणि त्या विचाराने प्रेरीतहोवून
या वेबसाईटची संकल्पना मुळ धरु लागली. महाराष्ट्रातुन प्रसिध्द होणारी सर्व मासिके
त्यांच्यासध्याच्या मांडणीत जशीच्या तशी वेबसाईटवर उपलब्ध करु शकलो तर.....
या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी मग साची वेबनेट प्रा.लि.या कंपनीची स्थापना
केली आणि सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडण्याचा जणू विडाच उचलल्यासारखेझाले. या कामाच्या
पाठिशी भक्कम अशी कंपनी कार्यरत असल्यामुळे सर्व कामे कोणत्याहीअडथळ्याशिवाय पूण करता
येतील याची आम्हाला खात्री आहे. या वेबसाईट्वर महाराष्ट्रातुन प्रसिध्द होणारी आणि
सर्व विषयांनावाहिलेली सर्व मासिके आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. ज्यायोगे सर्व मराठी
बांधवाना चांगल्या प्रतिचे आणि उत्कृष्ट साहित्यत्याच्या कॉम्प्युटरवर त्यांच्या फावल्या
वेळेत केव्हाही उपलब्ध होईल.
आमची अशी अंतरिक इच्छा आहे कि, मराठी साहित्य जगांत सर्वदूरपोहोचावे आणि साहित्याची
व्यापकता वाढावी. साहित्याची व्यापकता वाढल्यास, उत्कृष्ट साहित्य निर्मिती होवूशकेल
व नवनविन लेखक, कवी उदयाला येतील.साहित्याला वाचक मिळाल्यावर प्रकाशकांना देखील नवा
हुरुप येऊनतेही बरेचसे साहित्य प्रकशित करण्यास प्रोत्साहीत होतील आणि चांगले साहित्य
आपल्यासमोर येईल.
या वेबसाईट्वर पाहिले काही दिवस मासिके मोफत वाचनाची सेवा उपलब्धकरुन देण्यांत आली
आहे. त्याचा मराठीबांधवानीपुरेपूर फायदा घ्यावा. तदनंतर किरकोळ वार्षिक फि भरुन या
सेवेचा मनमुराद आनंद लुटतायेवू शकेल. आमचा हा छोटासा प्रयोग, आपल्या सहाय्याने सफल
व्हावा हिच इच्छा.आपणांस काहिसुचना करावयाच्या असल्यासआम्ही आपल्या सुचनांचे निश्चितच
स्वागत करु. हि वेबसाईट आणित्यावरील उपलब्ध साहित्य आपल्या पसंतीस उतरल्यावर आपल्या
आप्तापर्यंत तसेच मित्रमंड्ळीतयाचा उल्लेख आपण नक्की कराल याची आम्हाला पूण खात्री
आहे.चला तर मराठी साहित्याचा सूर्यसर्व जगावर सतत तळ्पत ठेवू या!!!!